कृषी

भीमाशंकर कारखान्याकडून ऊस पीक स्पर्धेचे आयोजन :  बाळासाहेब बेंडे

महाबुलेटीन नेटवर्क / अविनाश घोलप
घोडेगाव : दत्तात्रयनगर, पारगाव ( ता.आंबेगाव ) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत दरवर्षीप्रमाणे गाळप हंगाम २०२०-२१ साठी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व गावांसाठी ऊस पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्र व परिसरामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये ऊस उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ‘दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ’ योजने अंतर्गत या ऊस पिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून नाममात्र प्रवेश शुल्क रक्कम रु. १००/-  घेण्यात येते. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२० असून स्पर्धेतील बक्षिसे खालीलप्रमाणे आहेत.
हंगामनिहाय आडसाली, पुर्वहंगामी, सुरु व खोडवा प्रकारातील ऊसाचे जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या ऊस उत्पादकास तसेच संपुर्ण हंगामात एका नावावर जास्तीत जास्त ऊस गाळपास देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम क्र. २५ हजार रुपये, द्वितीय क्र. १५ हजार रुपये, तृतीय क्र. १० हजार रुपये प्रती एकरी १२० मे. टनाच्या पुढे ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये व १०० मे. टनाचे पुढे ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना १० हजार रुपये, कार्यक्षेत्रातील एका गावातून १०००० मे. टनापेक्षा जास्त व एकूण ऊसापैकी ८० टक्के पेक्षा जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या गावास प्रथम क्र. ५० हजार रुपये, द्वितीय क्र. ४० हजार रुपये, तृतीय क्र. ३० हजार रुपये स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात येते. ऊस पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कारखान्याचे विभागीय शेतकी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन चेअरमन बेंडे यांनी केले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 02 Aug 2026

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…

18 hours ago

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

7 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

2 weeks ago

This website uses cookies.