इंदापूर

सावकारकीतून अंगावर गाडी घालून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : व्याजाचे पैसे देण्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जीप अंगावर घातल्याच्या कारणावरुन बाभुळगाव ( ता. इंदापूर ) येथील सावकारीचा व्यवसाय करणा-या इसमासह त्याच्या अनोळखी साथीदारावर शनिवारी ( दि.२५ जुलै ) रात्री उशीरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पांडुरंग भागवत गुटाळ ( रा. बाभुळगाव, ता. इंदापूर )असे या सावकाराचे नाव आहे. प्रताप बाबुराव मिसाळ ( वय ३६ वर्षे, रा. बाभुळगाव, ता. इंदापूर ) यांनी या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवणा-या फिर्यादी मिसाळ यांनी तीन वर्षांपूर्वी गुुुुटाळ याच्याकडूूून व्याजाने दहा हजार रुपये घेतले होते. शनिवारी ( दि.२५ जुलै ) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मिसाळ आपल्या दुचाकीवरुन बाभुळगाव येथील आपल्या घरी चालले होते. बाभूळगावच्या हद्दीत भवानीआईचे ओढ्यावरुन जात असताना आरोपी गुटाळ हा बोलेरो जीप ( क्र. एम. एच. १२ के ५३५०) मधून आपल्या अनोळखी साथीदारा समवेत वेगाने फिर्यादीच्या पाठीमागून आला. फिर्यादीस अडवुन, तीन वर्षापुर्वी दहा टक्के व्याजाने दिलेल्या दहा हजार रुपयांचे व्याज का दिले नाही,अशी आरोपीने विचारणा केली. त्यावर सध्या तारांबळ चालू आहे. दोन चार दिवसांनी व्याजाचे पैसे देतो, असे फिर्यादीने त्यास सांगितले. त्यावर चिडून जावून फिर्यादीच्या जातीचा उल्लेख करत पैसे देणे होत नसेल तर कशाला पैसे घेता, असे म्हणत आरोपीने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी अंगावर धावुन येत असल्याने भितीपोटी फिर्यादी आपल्या दुचाकीवरुन जोरात निघाला असता, थांब तुझ्या अंगावर गाडी घालून मारुन टाकतो, असे म्हणत आरोपीने फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दुचाकीस जीपने ठोस मारली. फिर्यादी दुचाकीसह रस्त्यावर पडल्यानंतर आरोपी व त्याचा साथीदार शिव्या देत त्याच्या जीपमधून उतरून फिर्यादीस मारण्यासाठी येवू लागले. ते पाहून फिर्यादी आपली दुचाकी तेथेच टाकून घरी पळुन गेला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या फिर्यादीवरुन दोन्ही आरोपींविरुध्द, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम, १९८९ चे कलम ३ (२)( व्ही.ए ), महाराष्ट्र सावकारी ( नियमन ) अधिनियम, २०१४ चे कलम ३९, ४४, ४५, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ चे कलम ७ (१) (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

3 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

4 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

5 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

6 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

7 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.