शैक्षणिक

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, बीएस्सी कॉम्पुटर सायन्स, बीबीए (सी.ए.) या वर्गांची प्रवेश प्रक्रिया दि. २७ जुलै पासून ऑनलाईन सुरू करण्यात आलेली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.hrmrajgurunagar.ac.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन मेरीटचा फॉर्म भरणे आवश्यक आहे.  मेरीटचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्टपर्यंत आहे. फॉर्म भरण्यासंदर्भात अधिक माहिती महाविद्यालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी ( ९९२२७४१२४५ ) उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे ( ९६०४३०९०६० ) आणि प्रबंधक कैलास पाचारणे ( ९८५०००८६२६ ) यांचेशी संपर्क साधावा. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने मेरीटच्या फॉर्मपासून संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविली असून प्रवेश शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन  असे पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः ची काळजी घेत प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन पध्दतीने राबविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी केले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

1 day ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

3 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

4 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

5 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

1 week ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

This website uses cookies.