दिन विशेष

आज कारगिल विजय दिवस

कारगिल युद्धाला आज 21 वर्षे झाली… 26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला.
या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. चला तर मग जाणून घेऊयात कारगिल विजय दिवसाबद्दलच्या गोष्टी..
● भारत आणि पाकिस्तानमध्ये जुलै 1999 मध्ये कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचं उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली होती.
● समुद्र सपाटीपासून 18 हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्यानं धाडसानं शत्रूवर विजय मिळवला होता.
● 8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली तसेच भारतीय सैन्यानं कारगिल युद्ध जिंकलं.
● या युद्धात भारतीय सैन्याचे 500 हून अधिक जवान शहिद झाले होते तर जवळपास एक हजारहून अधिक जवान जखमी झाले होते.
● भारतीय वायूदलाने युद्धादरम्यान मिग 27 आणि मिग 29 या दोन लढाऊ विमानांचा वापर केला होता.
● 8 मे रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर 11 मे पासून भारतीय वायूदलाने सैन्याची मदत करण्यात सुरुवात केली. जवळपास 300 लढाऊ विमानं युद्धभूमीवर उतरवण्यात आली होती.
● 1999 च्या फेब्रुवारीपासूनच पाकिस्तानी लष्कराने भारतीय चौक्यांचा ताबा घेण्यास सुरुवात केली होती.
● पाकिस्तानने ज्या भागावर कब्जा मिळवला होता तेथे बॉम्बहल्ले केले. पाकिस्तानच्या अनेक ठिकाणी आर-77 मिसाईलद्वारा हल्ला करण्यात आला होता.
● या युद्धात 18 ग्रेनेडियर्स, 2 राजपुताना रायफल्स, 13 जम्मू-काश्मीर रायफल्स, 18 गढवाल रायफल्स आणि 8 शीख रेजिमेंट या सैन्य तुकड्यांनी विशेष पराक्रम गाजवला होता.
● कारगिल युद्ध हे ऑपरेशन विजय या नावाने सुद्धा ओळखले जाते.
संकलन : हनुमंत देवकर
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.