विधायक

एक वर्षाची वेतन वाढ दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला :  शिक्षक दाम्पत्याचा निर्णय

महाबुलेटीन नेटवर्क : अविनाश घोलप
घोडेगाव : देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोना बधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सगळीकडे लॉकडाऊन सुरू असल्याने राज्याची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य आर्थिक संकटात सापडलेले असताना आश्रमशाळेतील एका शिक्षक दाम्पत्याने आपली जुलै महिन्यापासून मिळणाऱ्या वेतनवाढीचे वेतन ( माहे जुलै २०२० ते जून २०२१ पर्यंतचे ) कोविड १९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
शासकीय आश्रमशाळा घोडेगाव येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत रामचंद्र नाईकडे व शासकीय आश्रमशाळा गोहे बुद्रुक येथे कार्यरत असलेल्या उच्च माध्यमिक शिक्षिका कोमल चंद्रकांत नाईकडे ( दोघेही रा. कडधे, ता. खेड, जि. पुणे ) यांनी याअगोदर देखील एक दिवसाचे वेतन व प्रत्येकी ५५५५/- रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ( खाते क्र. ३९२३९५९१७२० )  दिलेला आहे. कोरोनासाठी कार्य करत अनेक डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबॉय, सफाई कामगार व पोलिस यांनी आपल्या कुटुंबापासून दूर राहून, वेळेप्रसंगी उपाशी राहून, काहींना तर कोरोनाची लागण होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या जीवपेक्षा आम्ही घेतलेला हा निर्णय निश्चितच शुन्य आहे. हा निर्णय या सर्वांना आदरांजली म्हणून समर्पित करत असल्याचे नाईकडे दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.