सण-उत्सव

आळंदीत एक गाव एक गणेश उत्सव राबविण्याची मागणी

महाबुलेटिन नेटवर्क
आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीसह राज्य आणि देशातही कोरोंनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने  सुरक्षिततेसाठी या वर्षातील गणेशोत्सव  साधेपणाने तसेच  एक गाव एक  गणेशोत्सव उपक्रम राबविण्याची मागणी  भैरवनाथ उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील यांनी केली आहे.
एक गाव एक गणपती या मागणीचे निवेदन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव,आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी यांना देऊन यासाठी गणेश मंडळांची स्वतंत्र बैठक लावण्याची  मागणी निवेदनात करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी श्री भैरवनाथ उत्सव मंडळ आळंदी ग्रामस्थ जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे त्यांनी निवेदनात त्यांनी म्हटले आहे.  आळंदी मधील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची यासाठी एक बैठक घेऊन सध्य स्थितीचा विचार करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे हजेरी मारुती मंदिर आळंदी या एकाच ठिकाणी श्रीची वैभवी गणेश मुर्ती बसवून अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा अशी विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
MahaBulletin Team

Recent Posts

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

20 minutes ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

This website uses cookies.