विधायक

मेदनकरवाडीत विविध वस्त्यांवर नामफलक बसविले

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : चाकण एमआयडीसीतील वाढत्या औद्योगिकरणामुळे परिसरातील गावे व वाड्या वस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. परिसरातील दाट लोकसंख्येमुळे रहिवासी वसाहतीही वाढल्या आहेत. प्रत्येक गावात गृह प्रकल्प, सोसायट्या, कॉलनी, गल्ली, नगरे वाढली आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणाला नाव असेल तर परगावाहून येणाऱ्या नागरिकांना पत्ता शोधणे सोपे जाते. याच हेतूने प्रत्येक वस्तीचे नामकरण करून त्याठिकाणी नामफलक बसविण्याचा उपक्रम मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथे करण्यात आला.
गावात विविध नगरे, सोसायटी, कॉलनी विविध ठिकाणी वस्तीच्या नावांचे एकूण १० नामफलक सरपंच प्रियांकाताई मेदनकर-चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बसविण्यात आले. येथील बंगलावस्ती या ठिकाणी ग्रा. पं. सदस्य अमित बापू मेदनकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच रामदास मेदनकर, उपसरपंच दीपिका दत्तात्रय गोरे, ग्रा.पं. सदस्य महेंद्र मेदनकर, संदीप मेदनकर, दत्तात्रय गोरे, पांडुरंग कांबळे, मयूर खरात, उद्योजक पांडुरंग लष्करे व ग्रामस्थ उपस्थित होते.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

7 hours ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

3 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

6 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

This website uses cookies.