कोरोना

पुणे विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64 टक्के -विभागीय आयुक्त सौरभ राव

महाबुलेटिन नेटवर्क
पुणे – पुणे विभागात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास 64 टक्के असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. विभागातील  81 हजार 764 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 967 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 961  आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.98 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62  टक्के इतके आहे.
 पुणे जिल्हयातील 97  हजार 309 बाधीत रुग्ण  असून कोरोना बाधित  68 हजार 775 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26  हजार 303 आहे.  पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2  हजार 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.68  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.29  टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 370 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 331, सातारा जिल्ह्यात 198, सोलापूर जिल्ह्यात 332 ,  सांगली जिल्ह्यात 229 तर कोल्हापूर जिल्ह्यात 280 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत  4 हजार 747 रुग्ण असून 2 हजार 349  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 252  आहे. कोरोनाबाधित एकूण 146  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 9 हजार 822 कोरोना बाधीत रुग्ण असून 6  हजार  13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 281 आहे. कोरोना बाधित एकूण 528  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 669 रुग्ण असून 1 हजार 16 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 545 आहे. कोरोना बाधित एकूण 108  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 8 हजार 420  कोरोना बाधीत रुग्ण असून 3  हजार 611 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार 580 आहे. कोरोना बाधित एकूण 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण  6 लाख 41  हजार 88  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी  1  लाख  23 हजार 967 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

7 hours ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

3 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

6 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

This website uses cookies.