२२ दिवसात १२ गावठी कट्टे हस्तगत, एल.सी.बी.ने केली कारवाई

भुसावळ येथे गावठी कट्टे सापडण्याचा सिलसिला सुरूच
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
भुसावळ : येथील यावल रोडवरील नाक्याजवळ वनविभागाच्या कार्यालयासमोर संशयित आरोपी सागर बापूराव सपकाळे  ( रा. अंजाळे, ता. यावल ) यास गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई  केली आहे. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३८२/२०, आर्म ॲक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी सपकाळे हा यावल रोडवरील गांधी पुतळ्यासमोर यावल नाक्याजवळील वनविभागाच्या कार्यालयाजवळ उभा असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली. हे पोलीस पथक ९ रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील गुन्ह्याच्या तपासासाठी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आले होते. मात्र त्यांना माहिती मिळताच पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, पो. हे. कॉ. कमलाकर बागुल, चालक पो. ना. दादाराव पाटील, पो. ना. प्रवीण हिवराळे यांनी घटनास्थळी सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व अडीच हजार रुपये किमतीचे जिवंत काडतुसे मिळाली.
या गावठी कट्ट्यावर मेड इन यू. एस. इ. ३२ एम. एम. असे लिहिले आहे. आरोपीस शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर, बाजारपेठ व तालुका पोलीस स्टेशनला आतापर्यंत २२ दिवसात १२ गावठी कट्टे सापडल्याची नोंद करण्यात आली आहे.
admin

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

4 hours ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

8 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.