कोरोना

झिका व्हायरस…पुणे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील 79 गावे जाहीर ● खेड तालुक्यातील 10 गावांचा समावेश; खेड, बारामती व हवेली तालुक्यात सर्वाधिक गावे, ● पहा कोणत्या तालुक्यात कोणती गावे

झिका व्हायरस…पुणे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील 79 गावे जाहीर
● खेड तालुक्यातील 10 गावांचा समावेश; खेड, बारामती व हवेली तालुक्यात सर्वाधिक गावे,
● पहा कोणत्या तालुक्यात कोणती गावे

महाबुलेटीन न्यूज । प्रसन्नकुमार देवकर  
पुणे : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी होत असतांनाच झिका व्हायरसचे (Zika Virus) नवे संकट समोर येत आहे. जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिकाचा पहिला रुग्ण आढळले असून, आरोग्य यंत्रणेत गोंधळ उडाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील 79 गावे झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 कलमी कार्यक्रम आखला आहे. यामध्ये हवेली तालुक्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. तसेच सर्वात कमी आंबेगाव तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. मागील तीन वर्षांत सातत्याने या गावांत डेंग्यू व चिकुनगुनिया या आजारांचा उद्रेक होत आहे. त्यामुळे ही गावे झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यानी आदेशात सांगितले आहे.

तालुकानिहाय अतिसंवेदनशील गावे पुढीलप्रमाणे :-
पुरंदर : सासवड, ढुमेवाडी, पारगाव, नीरा, सुपे खुर्द, बेलसर, जेजुरी.
हवेली : देहू, नांदेड, नऱ्हे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे, खानापूर, मणेरवाडी, खेड, वाघोली, कोळवडी, मांजरी बुद्रुक, केशवनगर, उरुळीकांचन, शिंदवणे, कोरेगाव मूळ, खामगाव टेक, पिंपरी सांडस, थेऊर.
इंदापूर : निमगाव केतकी, शेळगाव, यादववाडी, कुरवली, माळवाडी, तक्रारवाडी, भादलवाडी.
बारामती : तरडोली, सुपा, काळखैरेवाडी, मोरगाव, सटवाजीनगर, अंबराई, आनंदनगर, तांदूळवाडी, माळेगाव विद्यानगर, सूर्यनगरी, कटफळ.
खेड : राजगुरुनगर शहर, पांडूरंगनगर, शिरोली, आळंदी, मरकळ, भोसे, निघोजे, मोई, मेदनकरवाडी, गोसासी.
दौंड : दौंड शहर, समतानगर, होलारवस्ती, कुरकुंभ, हिंगणी बेर्डी.
जुन्नर : आनंदवाडी, ओतूर, येणेरे, राजुरी, पिंपळवंडी, काळदरी.
वेल्हे : करंजावणे, खामगाव क्षेत्र, ओसाडे, साखर, आंत्रोली.
शिरूर : वढू बुद्रूक, मांडवगणफराटा, गारमाळ, सादलगाव. ●भोर : भुतोंडे, चिखलावडे, वाठार.
मुळशी : माण, सूस.
आंबेगाव : घोडेगाव.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.