महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यापासून आता दोन दिवसांवर दसरा सण येऊन ठेपला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांचे भाव वाढले असून निसर्ग चक्रीवादळ व परतीच्या पावसामुळे झेंडूचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्याचा परिणाम झेंडूच्या फुलांच्या पुरवठ्यावर झाला असून; यावर्षी झेंडूची फुले दिडशे ते दोनशे रुपये किलोने विकली जात आहेत.
नवरात्रोत्सवात पूजा-अर्चा करण्यासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या फुलांच्या मागणीचा विचार करून अनेक शेतकरी झेंडूची लागवड करतात. यावर्षी मात्र निसर्ग चक्रीवादळ व परतीच्या पावसाने झेंडूची शेती झोडपून काढल्यामुळे झेंडूच्या उत्पादनावर याचा परिणाम झाला असून झेंडूचे उत्पादन जवळपास ५० टक्क्यांनी घटले आहे. यामुळे ऐन नवरात्रोत्सवाच्या हंगामात झेंडूची आवक कमी झाली असून बाजारपेठेत एक किलो झेंडू दोनशे रु. पेक्षा अधिक किमतीने विक्री होत आहे.
दरवर्षी १०० ते १२० रुपये किलोने मिळणारा झेंडू यावर्षी दोनशे रुपये पार झाल्याने भक्तगणात नाराजीचा सूर आहे. मात्र पूजेसाठी आवश्यक असणारी फुले कमी-अधिक प्रमाणात का होईना ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत.
यावर्षी निसर्ग चक्रीवादळ व परतीच्या पावसाच्या तडाख्याने झेंडूची शेती नुकसानीत गेली आहे. जवळपास ५० टक्के रोपे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे उत्पादन कमी होत आहे. आणि याचाच परिणाम किरकोळ विक्रीवर झाला असून यावर्षी दिडशे ते दोनशे रुपये प्रति किलोने झेंडू विकला जात असल्याचे शेतकरी – विक्रेता सुधाकर सांडभोर यांनी सांगितले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.