येथे मिळणार बांधकाम कामगारांना वर्षभर दुपारचे जेवण मोफत

महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे
इंदापूर : पुणे येथील महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने इंदापूर शहरातील शंभर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लाॅकडाऊन व कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर पुढील एक वर्षभर दुपारचे जेवण मोफत देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते रमेश शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले की, सावतामाळीनगर मधील श्री संत सावतामाळी मंदिरात येथील महात्मा फुले सत्यशोधक प्रतिष्ठानची शाखा, म.फुले ग्रुप व कोमल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या शुभहस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पुण्याचे कामगार नेते जयंत शिंदे, इंदापूर नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते नेते नगरसेवक पोपट शिंदे, राष्ट्र सेवा दलाचे पुणे जिल्हा संघटक गफूरभाई सय्यद, म.फुले सत्यशोधक प्रतिष्ठानचे येथील अध्यक्ष विजय शिंदे व उपाध्यक्ष ख्वाजाभाई बागवान, तक्वा फाऊंडेशनचे अध्यक्ष मुन्नाभाई बागवान, नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अवधूत पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, सुनिता पवार, म.फुले ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य, नोंदणीकृत कामगार आदी यावेळी उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.