अशी असते गावकीची एकजूट!

महाबुलेटिन नेटवर्क
मंचर: समूह संक्रमणाचा धोका वाढल्याचे शहरातील चित्र आता ग्रामीण भागातही दिसू लागलेय. प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत असले तरी नागरिकांनीही खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. नियम आणि कायद्याचा बडगा यांपेक्षा आवश्यक असते स्वयंशिस्त. नेमकी हीच शिस्त मंचर  गाव पाळीत आले आहे. आता पुन्हा आठ दिवस  मंचर गाव  कडकडीत  बंद राहणार आहे. बंदचा कालावधी रविवारी ५ जुलै ते १२ जुलै असा असणार आहे.
         मंचरमध्ये कोव्हीड-१९ व्ही वाढती रुग्ण संख्या व समूह संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन  रविवारपासून (५जुलै ते १२ जुलै) ते पुढील रविवारी मध्यरात्रीपर्यंत कडक बंद पाळण्यात येणार आहे. या कालावधीत  मंचरमधील सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद राहणार आहेत.  फक्त अत्यावश्यक सेवा किराणा मालाची दुकाने सकाळी ९.०० ते दुपारी १.०० पर्यंत सुरु राहतील. दुध विक्री सकाळी ८.०० ते ९.०० व संध्याकाळी ५.३० ते ७.०० वा पर्यंत चालू असणार आहे. घराबाहेर विनाकारण पडू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
       अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या लोकांनी  तोंडाला मास्क  किंवा रुमाल असल्याशिवाय बाहेर पडू नये. कुणी तोंडाला मास्क  किंवा रुमाल न लावता बाहेर पडल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.दरम्यान या आवाहनास सर्व व्यापारी व ग्रामस्थ यांनी सहकार्य करून गाव समूह संक्रमनापासून रोखण्याचा निश्चय केला आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

2 weeks ago

This website uses cookies.