महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे
नारायणगाव : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव व वारूळवाडी येथे आज प्रशासनाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ऑक्सिजन लेवल, पल्स रेट, व तापमान याबाबतची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अशी माहिती पिंपळगाव चे तंटामुक्ती अध्यक्ष रंगनाथ गुळवे व वारूळवाडी चे उपसरपंच सचिन वारुळे यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, डॉ. वर्षा गुंजाळ, डॉ चैताली कांगुणे, वारूळवाडी चे उपसरपंच सचिन वारुळे, सदस्य राजेंद्र मेहेर, पिंपळगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष रंगनाथ गुळवे, मुख्याध्यापिका श्रीमती गडगे, स्वयंसेवक प्रज्योत येलमर, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर वाणी, रवींद्र खांडगे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप वाणी, संभाजी गुळवे, अंकुश गुळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
वारूळवाडी येथे रविवारी एकूण १४ हजार २५३ एवढ्या लोकसंख्ये पैकी १३८४३ ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २४० सस्पेक्टेड रुग्ण आढळले. यापैकी २१ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या सर्वेक्षण कामामध्ये एकूण ७७ टीमने सहभाग घेतला. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.