महाबुलेटीन न्यूज : विनोद गोलांडे
बारामती : ग्रामपंचायत करंजेपुल व ज्यूबिलंट भारतीया यांच्यावतीने करंजेपुल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. करंजेपुल शेतकरी गट व ज्यूबिलंट भारतीया कंपनीच्या वतीने आंबा, नारळ, पेरू व लिंबू अशा प्रकारची एकूण १५०० झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या शुभहस्ते व ज्यूबिलंट भारतीयाचे उपाध्यक्ष सतिश भट यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना काकडे यांनी अश्या प्रकारे सर्व ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण करण्याची गरज व्यक्त केली. तसेच जिल्हा परिषदेच्या dpdc विभागांतर्गत येथून पुढे होणाऱ्या रस्त्यांच्या कामामध्ये कंत्राटदारांनी पाच झाडे लावली पाहिजेत, असा ठराव केल्याचे सांगितले.
ज्यूबिलंट भारतीयाचे उपाध्यक्ष सतीश भट यांनी सांगितले की, तुम्ही एक पाऊल टाका, आम्ही दोन पाऊले टाकतो व येथून पुढे ग्रामपंचायतीच्या इतर उपक्रमाना आम्ही सहकार्य करू.
सरपंच वैभव गायकवाड यांनी सांगितले की, ग्रामपंचायत स्वखर्चाने या झाडांचे संगोपन करेल व सर्व परिसर हिरवागार करेल. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला.
याप्रसंगी मा सरपंच बाळासाहेब गायकवाड, करंजे सोसायटीचे मा. चेअरमन कैलास मगर, सदस्य लतीफ मुलाणी, ग्रामसेवक आबा यादव, मुख्याध्यापिका उषा जाधव, गणेश गायकवाड, बाळू गायकवाड, बाळू मोटे, नवनाथ गायकवाड, सूर्यकांत गायकवाड,पराग मासाळ, लक्ष्मण लकडे व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच वैभव गायकवाड यांना किरण गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रास्ताविक संतोष शेंडकर यांनी केले; तर आभार बाळासाहेब गायकवाड यांनी मानले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.