महाबुलेटीन न्यूज
चाकण : “कोरोनाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. चाकणला ज्या गतीने कोरोनाचा प्रदूर्भाव वाढत आहे, त्या गतीने आपल्याकडे आरोग्य सुविधा उपलब्ध नाही. म्हणून अजूनही आरोग्य सुविधा करण्याची नितांत गरज आहे. आताच जिल्हाधिकारी व सीओ भेट देऊन सूचना दिल्या आहेत. दोन दिवसात सुविधा झाल्या नाहीतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मी प्रयत्न करणार आहे. वेळ पडल्यास खासगी हॉस्पिटल्स ताब्यात घेऊ व त्याठिकाणीही उपचार सुरू करू”, अशी ग्वाही दिलीपराव मोहिते पाटील यांनी दिली.
चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व आमदार दिलीपराव मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. एन. जी. ढवळे, चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, तलाठी श्रीधर आचारी आदी उपस्थित होते.
—–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.