पुणे जिल्हा

महावितरण व जनसेवा विकास समितीच्या वतीने जनता दरबार…वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

महावितरण व जनसेवा विकास समितीच्या वतीने जनता दरबार…
वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी 
तळेगाव दाभाडे : विद्युत महावितरण तळेगाव दाभाडे व जनसेवा विकास समितीच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील जोशीवाडी येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला. त्यास वीज ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे व विद्युत महावितरण तळेगाव दाभाडे युनिटचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे साहेब यांच्या संकल्पनेतून ग्राहकांच्या वीज बिलांसंबंधी असणाऱ्या तक्रारींचे निवारण करणे, थकीत वीज बिलांना सुलभ हफ्ते करून देणे, चुकीच्या वीज बिलाची दुरुस्ती करून देण्या साठी सदर जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. 

मागील आठवड्यात विद्युत महावितरणचे अधिकारी थकीत वीज बिलांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आले असता जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा कडाडून विरोध केला व वीज पुरवठा खंडीत न करण्याचे आवाहन करण्यात आले. जोशीवाडी व परिसरातील कुटुंब मध्यम वर्गीय व कष्टकरी कामगार वर्गातील असल्याने वीज पुरवठा खंडित करण्या आधी सदर नागरिकांच्या समस्या विद्यूत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समजून घ्याव्यात, असे आवाहन किशोर आवारे यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे यांना केले.

राजेंद्र गोरे यांनी जनसेवा विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत जनता दरबाराचे आयोजन केले. या वेळी जोशीवाडी व परिसरातील बहुसंख्य नागरिक वीज बिलांसकट आपल्या तक्रारी मांडण्यासाठी उपस्थित होते. बहुसंख्य थकीत वीज बिल ग्राहकांना किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुलभ हफ्ते करून दिले.

जागेवर वीज बिल भरणा देखील करण्यात आला तसेच चुकीच्या वीज बिलांची दुरुस्तीही करण्यात आली. थकीत वीज बिलांमुळे एकही विद्युत पुरवठा खंडित करून देणार नाही, असे किशोर आवारे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. जनसेवा विकास समितीचा विद्युत जनता दरबार हा वाड्या वस्त्यांमध्ये राबवावा, आम्ही सुलभ हफ्ते करून देऊ, असे राजेंद्र गोरे यांनी आश्वासन दिले.

याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक सुनील कारंडे, नगरसेवक रोहित लांघे, प्रवक्ता मिलिंद अच्युत, आरपीआयचे सुनील पवार, महावितरणचे राठोड साहेब, प्रशांत गवारे, रोखपाल सय्यद साहेब व बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

2 days ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

5 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

6 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

7 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

2 weeks ago

This website uses cookies.