विधायक

सामाजिक संस्थांकडून म्हाळुंगे कोविड सेंटरला शंभर बेड

लोकसहभागातून राबविला सामाजिक उपक्रम : कामगारांनी दिला एक दिवसाचा पगार
महाबुलेटीन नेटवर्क / वैभव हन्नुरकर
पिंपरी-चिंचवड : वसंत ग्रूप, रोटरी क्लब ऑफ निगडी,  निगडी- प्राधिकरण रेसिडेंट फोरम, नॅशनल सोशल ग्रूप आणि एस के एम स्टील्स यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण एमआयडीसीतील म्हाळूंगे इंगळे ( ता.खेड ) येथील कोविड सेंटरला शंभर बेड देण्यात आले.
या उपक्रमासाठी वसंत ग्रूपचे चेअरमन प्रेमचंद मित्तल, अरुण मित्तल, अनिल मित्तल, सुनील मित्तल, रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण घाणेगावकर, सेवा संचालक मुकुंद मुळे, नॅशनल सोशल ग्रूपचे अध्यक्ष कैलाश पारेख, जिगर व्यास, कीर्ती शहा, ॲड. अर्जुन दलाल यांनी पुढाकार घेतला.
शहरी आणि ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांचे  प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा अपुऱ्या पडत असल्याने ग्रामस्थांनी मागणी केली होती. वसंत ग्रुपच्या सर्व कामगार, स्टाफ यांनी आपला एक दिवसाचा पगार या उपक्रमासाठी दिला असून वसंत ग्रूपचे मॅनेजिंग डायरेक्टर यांनी देखील प्रोत्साहन दिले. अनिलकुमार मित्तल तसेच एस के एम स्टील लिमिटेड मुंबईचे कीर्ती शहा यांच्या हस्ते कोविड सेंटरकडे सुपूर्द केले. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे विशेष सहकार्य लाभले. ह्या बेडस मुळे कोरोना ग्रस्तांचे हाल कमी होतील, खेडे गावात ह्याचा अधिक उपयोग होइल. अनेक लोक एकत्र येऊन उपक्रम केल्याने हा एक आदर्श लोकांसमोर ठेवला आहे, तसेच सामजिक बांधीलकीचे भान ठेऊन काम केल्याने समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 30 Apr 2026

बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 30 Apr 2026

मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 28 Apr 2026

सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…

6 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

1 week ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

1 week ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.