प्रशासकीय

खेड मध्ये प्रांत कार्यालय ‘लॉकडाऊन’ : प्रांताधिकारी,पोलीस अधिकारी ‘पॉझिटीव्ह’

आता तर सर्वच कार्यालये कोरोना सावटाखाली !
महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर : एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह एक वरिष्ठ महसूल अधिकारी खेडचे प्रांताधिकारी संजय तेली कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालये जणू कोरोनाच्या सावटाखाली आहेत. खेड तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून प्रांत कार्यालय हे शासकीय कार्यालय बंद करून कर्मचारी क्वारंटाईन करण्यात आल्याच्या वृत्ताला एक अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.
    काही दिवसांपूर्वी एक पोलिस अधिकारी कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह सापडले. लगोलग प्रांत अधिकारीही कोरोना पॉझिटीव्ह सापडले. त्यांच्या संपर्कात दुसऱ्या कार्यालयातील तहसील अधिकारी आले होते. त्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली असून अहवाल येणे प्रतीक्षेत आहे. दरम्यान प्रांताधिकारी यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे संबंधित त्यांच्या अहवालावर दुसरे महसूल कार्यालय सुरू की बंद राहणार हे अवलंबून आहे. दरम्यान महसुलाच्या एका कार्यालयातील कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
      खेड तालुक्यातील महसूल व पोलीस कार्यालये वरिष्ठ अधिकारी पॉझिटीव्ह आल्याने कोरोनाच्या सावटाखाली आहेत. खेड तालुक्याने आठशेचा टप्पा ओलांडला असून समूह संक्रमण सुरू झाल्याची परिस्थिती आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विलगिकरण शिस्त व सामाजिक अंतर ठेवण्याची आणि यापुढे अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. महसूल कार्यालय कामकाजाच्या दिवशी बंद, ही खेडच्या इतिहासातील पहिली वेळ असावी.
      दरम्यान पोलीस अधिकारी पॉझिटीव्ह आल्यानंतर १९पोलिसांची चाचणी घेण्यात आली होती, त्या सर्वांची  टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

1 hour ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

2 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

4 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

1 week ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

This website uses cookies.