महाबुलेटिन न्यूज
नवी दिल्ली : वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही समान हिस्सा मिळावा या मुद्द्यावर बराच वाद झाल्यांनतर सर्वोच्च न्यायालयाने अखेर या प्रकरणावर आपला ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आता यापुढे वडिलांच्या संपत्तीत मुलीला समान हिस्सा मिळेल असा कोर्टाने निकाल दिला आहे.
आपल्या वडिलांच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावाप्रमाणे समान हिस्सा/वाटा मिळेल, असे २००५ मध्ये अधिनियमित केले गेले होते. त्यानुसार मुलगा व मुलगी दोघानांही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळेल. परंतु हा कायदा २००५ पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांना याचा लाभ मिळेल कि नाही, हे स्पष्ट नव्हते. आज न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल, असा ऐतिहासिक व महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
वडिलांच्या संपत्तीत वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान हिस्सा/वाटा मिळाला पाहिजे, असे स्पष्ट केले आहे.
मुलीला १९५६ च्या कायद्यानुसार हिस्सा मिळणार होता. पण २००५ सालात केंद्र सरकारने यात बदल केला. मात्र त्यात २००५ सालानंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान हिस्सा मिळणार असा बदल करण्यात आला, आता हा मुद्दा कायमचा वगळण्यात आला आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.