राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या मुलीला दिली पहिली लस
महाबुलेटिन न्यूज
मॉस्को : संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार केल्याने दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना रशियातून मात्र अवघ्या जगासाठी आनंदाची व दिलासादायक बातमी आली आहे. रशिया मध्ये तयार करण्यात आलेल्या लसीला त्यांच्या आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सर्वप्रथम त्यांच्या मुलीला या लसीचा डोस दिला आहे.
रशियाने केलेला हा दावा खरा असेल तर ही जगातील पहिली कोरोना लस असेल. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने केवळ २२५ रुपयात कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले असताना रशियात लस लॉंच झाल्याने भारतीय लस कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रशियातील आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेने ही कोरोनाची लस तयार केली आहे. रशियन आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार, जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली, तर येत्या ऑक्टोबरपासून या लसीचे देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु होईल.
मॉस्कोतील गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने ऍडेनो व्हायरसला बेस बनवून हि लस तयार केली आहे. येथील संशोधकांचा असा दावा आहे कि, या लसीमध्ये वापरलेले पार्टिकल्स स्वतःची प्रतिकृती बनवू शकत नाहीत. विशेष म्हणजे संशोधकांनी व शास्त्रज्ञांनी क्लिनिकल ट्रायल दरम्यान या लसीचा स्वतःवर प्रयोग केला होता.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.