महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : वडगाव पाटोळे (ता.खेड, जि.पुणे) येथील गायकवाड वस्तीजवळ आज बुधवार ( दि.१८ ऑगस्ट ) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुभाष निवृत्ती गायकवाड यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. गायकवाड यांनी आरडा ओरड केल्याने सुदैवाने ते हल्यातुन बचावले. याअगोदर ३ ऑगस्टला येथील युवकावर बिबट्याने हल्ला केला होता. १५ दिवसांत बिबट्याने वडगाव मध्ये हा दुसऱ्यांदा हल्ला केला आहे.
गेली अनेक दिवसांपासून वडगांव पाटोळे परिसरात बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. या परिसरात रानुबाई मळा, तोत्रे वस्ती, साबळे वस्ती आणि गायकवाड वस्ती येथे बिबट्या दिसून आला आहे. आता पर्यंत वनखात्याला साबळे वस्ती येथे बिबट्याला जेर बंद करण्यात यश आले आहे. अजून ही या परिसरात किती बिबट्याचा वावर आहे ? हे सांगता येत नाही. मात्र या बिबट्याच्या होत असलेल्या प्राण घातक हल्याने येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सुभाष गायकवाड हे आज सकाळी वस्तीजवळ असणाऱ्या कालव्या जवळून आपल्या घराकडे चालले होते. त्यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करत जखमी केले. सुदैवाने त्यातून ते बचावले. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.