पुणे जिल्हा

उत्तर पुणे जिल्ह्यात बोगस ड्रायव्हिंग स्कूलचा सुळसुळाट… कायदेशीर कारवाई करण्याची मागणी..

उत्तर पुणे जिल्ह्यात बोगस ड्रायव्हिंग स्कूलचा सुळसुळाट…
कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.

महाबुलेटीन न्यूज : वसंत शिंदे  
पिंपरी-चिंचवड : जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यामध्ये बोगस ड्रायव्हिंग स्कूलचा सुळसुळाट झाला असून संबंधित बोगस स्कुलवर कायदेशीर कारवाई करून बंद करण्यात यावी, अशी मागणी शासकीय परवानाधारक ड्रायव्हिंग स्कुल धारकांनी  केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जुन्नर आंबेगाव खेड या तीन तालुक्यांमध्ये चार चाकी जड वाहतूक आणि मोटर सायकल चालवण्यासाठी याबाबत नागरिकांना ट्रेनिंग देण्यासाठी  ड्रायव्हिंग स्कुल आहेत. ही सर्व स्कुल शासकीय नियम व अटीनुसार पिंपरी चिंचवड आरटीओ कडून शासकीय परवाना घेऊन नागरिकांना सुविधा देत आहे. मात्र दोन वर्षापासून तिन्ही तालुक्यामध्ये परिवहन कार्यालयाच्या शासकीय नियमांना बगल देऊन बिनदिक्कतपणे बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कुल सुरू झाली आहेत. शासकीय नियमानुसार ड्रायव्हिंग स्कुल धारकांना चालवण्यासाठी महिन्याला मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे, मात्र बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कुल एक चार चाकी गाडी घेऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दीडशे ते दोनशे स्क्वेअर फुट दुकानात चालू करून शासनाची फसवणूक करत आहेत. वास्तविक यामुळे नागरिकांना दुय्यम दर्जाचे आणि शास्त्रोक्त वाहन चालवण्याचे प्रशिक्षण न मिळाल्यामुळे वाहनांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याचबरोबर बोगस स्कूल मुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसुल बुडत आहे.
————-–—–
बरेच जणांनी सदर बोगस स्कुल पान टपरी प्रमाणे थाटली असून यामधील एक बोगस स्कूल तर चक्क बियरबार शेजारी आहे.
—–—––———

याबाबत पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अतुल आदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अशाप्रकारे शासकीय नियमांना बगल देऊन नियमबाह्य असणाऱ्या ड्रायव्हिंग स्कुलवर निश्चितच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा स्कुलमध्ये नागरिकांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केली आहे.
—–——––——

जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्यांमध्ये शासकीय परवाना धारक ड्रायव्हिंग स्कुल एकूण २५ असून बोगस ड्रायव्हिंग स्कुलची संख्या ११ इतकी आहे.
——––———–

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.