निवडणूक

खेड व मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक पुढे ढकलली..१६ तारखेपर्यंत निवडणूक रोखली.. उद्या ९ तारखेला जिल्हाधिकाऱ्यांसमोर होणार सुनावणी… खेड व मावळ तालुका वगळून उर्वरित ११ तालुक्यातील निवडणुका ९ व १० तारखेलाच होणार…

खेड व मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक पुढे ढकलली..१६ तारखेपर्यंत निवडणूक रोखली..
उद्या ९ तारखेला जिल्हाधिकाऱ्यांसमोर होणार सुनावणी…
खेड व मावळ तालुका वगळून उर्वरित ११ तालुक्यातील निवडणुका ९ व १० तारखेलाच होणार…

महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या खेड व मावळ तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदाच्या ९ व १० तारखेला होणाऱ्या निवडणुका १६ फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवण्यात आल्या असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढला आहे. उर्वरित तालुक्यांच्या निवडणुका यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे होणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका ९ व १० तारखेला होणार होत्या, परंतु खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, बिरदवडी, नाणेकरवाडी व मावळ तालुक्यातील परंदवडी या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल  झाल्या होत्या.

सदर याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी ९ तारखेला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी साठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ९ व १० फेब्रुवारीला होणाऱ्या खेड व मावळ तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडणूक १६ फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवल्या आहेत. हे दोन तालुके वगळून उर्वरित ११ तालुक्यातील निवडणुका यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार ९ व १० तारखेला पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.