पुणे जिल्हा

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची आपत्कालीन परिस्थिती गंभीर… अग्निशमन बंबात डिझेलची कमतरता…

महाबुलेटीन न्यूज : मिलिंद अच्युत
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची आपत्कालीन परिस्थिती गंभीर झाली असून अग्निशमन बंबात डिझेलची कमतरता असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

तळेगाव स्टेशन येथील ऐतिहासिक तळे परीसरात गवत आणि झाडांना शनिवारी (दि.१३) सकाळी ७.३० च्या सुमारास आग लागली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

सुमारे ८० लाख रुपये खर्च करून जानेवारी २०२० मध्ये नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात दाखल झालेला अग्निशमन बंब आपत्कालीन परिस्थितीतही केवळ पुरेशा डिझेल अभावी अग्निशमन केंद्रात उभा आहे. यामुळे नगरपरिषद प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषदेच्या पिंपोळोली शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत दळवी गुरुजी यांना शनिवारी (दि.१३) सकाळी ७.३० च्या सुमारास सर्वप्रथम तळ्याकाठी धुराचे लोट
दिसले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तळ्याकाठी गवतास आग लागली असून त्यामुळे शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडू शकतात, ही बाब दळवी यांनी तातडीने तळेगाव पोलीस स्टेशनला कळवली. यासंदर्भात पोलीस प्रशासनाने नगरपरिषदेचे अग्निशमन पर्यवेक्षक पद्मनाभ कुल्लरवार यांना कळवले. काहींनी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्याशी संपर्क साधला. नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनात पुरेसे डिझेल नसल्याने कुल्लरवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तळेगाव एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाशी तातडीने संपर्क साधला. व जलद अग्निशमनबंब पाठविणे बाबत सूचना केली.

दरम्यान, श्रीकांत दळवी आणि प्रशांत सोनवणे यांनीआपल्या जवळील बाटलीतील पाण्याने गोणपट ओले करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवराई संस्थेचे संस्थापक गिरीष खेर, प्राणीमित्र निलेश गराडे, तळेगाव अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र वाहत्या वाऱ्यामुळे आगीचे स्वरूप वाढत गेले. दरम्यान, तळेगाव एमआयडीसीचे अग्निशमन विभागाचे कपिल कांबळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर तासासभरात आग पूर्ण नियंत्रणात आणली. त्यामुळे शेकडो झाडांना जीवदान मिळाले. तळ्याकाठी अज्ञाताकडून कचऱ्याचे ढीग टाकले जाात असून त्यास आग लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. ही बाब गंभीर असल्याचे गिरीष खेर यांनी सांगितले.

अग्निशमन बंबाची डिझेलच्या टाकीतपुरेसे इंधन नसल्याने तळेगाव नगरपरिषदेचा बंब घटनास्थळी वेळेवर पोहचू शकला नाही. आग विझविण्यासाठी तळेगाव एमआयडीसीच्या अग्निशमनबंबावर अवलंबून रहावे लागले. ही बाब आमच्या प्रतिनिधीने प्रभारी मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्या निदर्शनास आणून दिली असता, कामठे म्हणाले, अग्नीशमन बंबात डिझेल भरण्याची व्यवस्था केली आहे. घटनास्थळी बंब पाठवून पूर्ण आग विझविण्यात आली आहे.

आमच्या प्रतिनिधीने बंबातील डिझेल संदर्भात प्रत्यक्ष महिती घेतली असता शनिवारी बंबात डिझेल भरण्यात आले नव्हते. स्थायी समितीच्या बैठकीत अग्नीशमन बंबातील डिझेलचा विषय मार्गी लागूनही ही वेळ यावी याबद्दलउपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे आणि विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत अत्यावश्यक सेवेतील अग्निशमन वाहनामध्ये डिझेल भरण्याची मंजुरी दिली असतानाही मुख्याधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप गणेश काकडे यांनी केला आहे.

कारण नसताना नगरपरिषदेचा अग्नीशमन विभाग बदनाम होत आहे. तळेगाव शहरासह मावळ तालुक्यात आगीची एखादी दुर्घटना घडल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी अग्निशमन बंबाची इंधनाची टाकी पूर्ण क्षमतेने भरलेली असणे आवश्यक आहे. भविष्यात अग्निशमक विभागाकडे सुपूर्त केलेली दोन्ही कोविड रूग्ण वाहिकांची डिझेल आणि पेट्रोल अभावी अशीच अवस्था होऊ शकते, अशी नगरपरिषद वर्तुळात चर्चा आहे.
——————

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत सुमारे दोन महिन्यांपासून मुख्याधिकारी नियुक्त झालेला नाही. कायमस्वरुपी मुख्याधिकारी नेमण्यासाठी प्रशासन कोणत्या मुहूर्ताची वाट पहात आहे ? मुख्याधिकारी नसल्याने कार्यालयीन कामकाजावर कोणाचे नियंत्रण नाही, आगीचा बंब वेळेवर उपलब्ध न होणे ही संतापजनक बाब आहे. शासनाने त्वरित कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
— किशोर आवारे : संस्थापक, जनसेवा विकास समिती
—————–

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.