गुन्हेगारी

पोटच्या अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेवून शारीरिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला चाकण पोलिसांनी केलं गजाआड….. ● आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी…

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण : भोसे गावात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या स्वाच्या पती विरोधात पोटच्या मुलीवर वाईट नजर ठेवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला तिचा पती, एक मुलगी व एका मुलासह खेड तालुक्यातील भोसे या गावात वास्तव्यास असून तिचा पती जावेद मोहम्मद बेग, ( वय ३२ वर्षे, व्यवसाय चालक ) याने स्वतःच्या मुलीला वाईट नजरेने मिठी मारली. याबाबत सुरवातीला तिने दुर्लक्ष केले मात्र यानंतर तिच्या नऊ वर्षीय मुलीने तिच्या नराधम बापाने तिच्याशी शारीरिक चाळे केले असल्याचे आईला सांगितले. याबाबत आईने तिच्या पतीला जाब विचारला असता जास्त शहाणपणा करू नको असे म्हणाला व त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. 

जावेद याने दिनांक ११/०३/२०२१ रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास त्याच्या स्वतःच्या राहत्या घरात स्वतःच्या नऊ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वारंवार झाल्याने तिच्या आईने चैतन्य महिला मंडळ, मोशी येथे याबाबतची हकीगत पोचवली. सदर संस्थेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत याप्रकरणी त्वरित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. त्यानुसार हा गुन्हा पीडितेने व तिच्या आईने दाखल केला आहे.

याप्रकरणी चाकण पोलिसांनी आरोपीला त्वरीत अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झेंडे हे करत आहेत. आरोपीला राजगुरुनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीच्या बचावात आरोपीच्या वकिलांनी नवरा-बायकोच्या भांडणातून सदरची खोटी फिर्याद दाखल केली असल्याचा युक्तिवाद केला. तर सरकारी वकील सौ. देशपांडे मॅडम यांनी सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून प्रत्यक्ष साक्षीदार मिळवायचे असल्याने तसेच पुढील तपासकामाकामी पोलीस कोठडीची मागणी केली.

स्वतःच्या मुलीवरच अतिप्रसंग करणाऱ्या अशा नराधमांना न्याय व्यवस्थेतून काय शिक्षा व्हायची ती होईलच, मात्र अशा घटना समाजव्यवस्थेवरती देखील दूरगामी परिणाम करत असतात त्यामुळे अशा प्रकरणात पोलिसांची भूमिका महत्वाची ठरते.
——————-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 22 Aug 2026

शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 20 Aug 2026

मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

MahaBulletin — 18 Aug 2026

सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

MahaBulletin — 17 Aug 2026

रविवार, १६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

MahaBulletin — 16 Aug 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.