पाऊल पुढे टाकताना…

संक्रमन हा सृष्टीचा नियम आहे. या नियमानुसार पत्रकारिता त्यास अपवाद नाही. पत्रकारितेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास विविध माध्यमांच्या निर्मितीतून इथपर्यंत येऊन पोहचला
खरे तर डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताशी साधर्म्य सांगणारे हे संक्रमन. शेपटीचा उपयोग नाही, म्हणून माणसाची शेपटी हळूहळू नष्ट होत गेली. उत्क्रांतीच्या या ढोबळ परिमानाशी पत्रकारितेतील संक्रमन चपखल बसते. त्यानुसारच तंत्रज्ञानाचा आधार घेत पत्रकारितेने संक्रमणाचा एकेक टप्पा गाठला. अतिशय गतिमान आणि विश्वव्यापी स्वरूप पत्रकारितेचे बनले.
पत्रकारितेतील हा व्यापक बदल खूप सकारात्मक आहे. पत्रकारिता कोणाची मक्तेदारी नाही, जणू हाच संदेश विविध माध्यमातून आणि त्यातून मिळणाऱ्या माहितीतून मिळत आहे. एकूणच ही मध्यवर्ती कल्पना आणि गाठीशी असणारा काही अनुभव यातून ऊर्जा मिळाली. या उर्जेतून एक नवी वाट आणि या वाटेवरचे पाऊल टाकताना थोडं मनातलं बोलावेसे वाटले.
काळ बदलत आहे. काळानुरूप समाजही बदलत आहे. बदलत्या काळासोबत प्रश्नांचे स्वरूप, समाजाच्या आनंदाच्या कल्पना, सामाजिक स्वास्थ्य वगैरे बदलत आहे. याचे प्रतिबिंब विविध माध्यमातून उमटत आहे. हे प्रतिबिंब काहीशा वेगळ्या, वेचक-वेधक पद्धतीने उमटविण्याचा आमचाही प्रयत्न असेल. महा बुलेटिन न्यूज हे व्यासपीठ त्या प्रयत्नांचा भाग असेल. अधिकृतपणाची कास धरीत मोजकेपणाने हे व्यासपीठ तुम्हा सर्वांचे असेल. सडेतोड, निर्भीडतेची जोड या व्यासपीठावरून होणाऱ्या पत्रकारितेस असेल. आपलं हक्काचं व्यायापीठ सर्व घटकांशी विश्वासाचं नातं दृढ करील, याचा विश्वास या निमित्ताने देत आहोत. महा बुलेटिन न्यूज आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी सेवेत रुजू करीत आहोत. चला तर एक पाऊल सोबत टाकून सुरुवात करूया…समाजातील सर्व क्षेत्रातील घटकांना न्याय मिळावा व सर्वांना हक्काचं व्यासपीठ मिळावे, यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र डोळ्यासमोर ठेवून निर्भीड पत्रकारितेचा मानदंड हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्या सेवेत रुजू होत आहे. आपली सर्वांची साथ अशीच सदैव आमच्या सोबत राहावी, ही विनंती.

आपले विश्वासू सहकारी,
हनुमंत देवकर                                   शिवाजी आतकरी
9822364218                                  9970719999

admin

Share
Published by
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.