मुसळधार पावसाने विसर्जनाच्या आनंदावर विरजण
महाबुलेटिन न्युज/तुषार वहिले
वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेले श्री पोटोबा देवस्थान संस्थानचा मानाचा पहिला गणपती सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त आज अखेरच्या दिवशी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व गणेश तावरे यांचे हस्ते आरती घेऊन श्री गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करत मानाच्या गणपतीचे विसर्जन महादेव मंदिर विहीर या ठिकाणी करण्यात आले.
यावेळी मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, सचिव अनंता कुडे, सहसचिव किरण भिलारे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, विश्वस्त सल्लागार अँड तुकाराम काटे, विश्वस्त अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, पुजारी सुरेश गुरव व पुरोहित विश्वासराव भिडे आदी उपस्थित होते.
गणेशउत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल देवस्थानच्या वतीने पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व वरिष्ठ पोलीस गणेश तावरे यांचा सत्कार करण्यात आला. मावळात दुपारनंतर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेकांची गणेशविसर्जनासाठी तारांबळ उडाली.
——–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.