गणेशोत्सव

श्री चक्रेश्वर तरुण मंडळाच्या लाडक्या गणरायाची उत्साहात प्राणप्रतिष्ठापणा

श्री चक्रेश्वर तरुण मंडळाच्या लाडक्या गणरायाची उत्साहात प्राणप्रतिष्ठापणा, यंदा गणपती सोमेश्वर मंदिरात साधेपणाने विराजमान…

महाबुलेटीन न्यूज / हनुमंत देवकर
चाकण : येथील सर्वात जुन्या श्री चक्रेश्वर तरुण मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा सोशल डिस्टनशिंग पाळत साधेपणाने संपन्न झाली.

श्री. चक्रेश्वर तरुण मंडळाच्या लाडक्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा व स्थापना महादेव मंदिर ट्रस्टचे संस्थापक व श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेचे विद्यानिकेतन व विद्याव्हँली इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक, शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रिडा व राजकीय वारसा व वसा असलेले देशमुख आळीचे व चाकणचे ज्येष्ठ नेते साहेबराव देशमुख यांच्या शुभहस्ते येथील सोमेश्वर मंदिरात करण्यात आली.

 

यावेळी चाकण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते जीवनशेठ सोनवणे, उद्योजक शामराव देशमुख, साईबाबा पतसंस्थेचे माजी चेअरमन अनिलशेठ देशमुख, बाळासाहेब देशमुख, रोटरीचे माजी अध्यक्ष सुधीरशेठ काकडे, सोसायटीचे सेक्रेटरी चंदनशेठ पानसरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

सर्व सदस्यांनी कोवीड १९ या महारोगासंदर्भात शासनामार्फत देण्यात आलेल्या सोशल डिंस्टनशिग या नियमांचे पालन करून तोंडाला मास्क लावून उपस्थिती लावली.

सदर कार्यक्रमास सर्व आजी माजी सदस्य तसेच लहान थोरांनी हिरहिरीने भाग घेऊन सोमेश्वर मंदिरात सुंदर आरास करून मंडळाचे ज्येष्ठ सभासद मा.श्री साहेबराव परशुराम देशमुख यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बाप्पाची आरास देशमुख साहेबांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आली. सर्व तरूण कार्यकर्ते यांनी मंदिर परिसर आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व सुंदर ठेवत सर्व परिसर सैनिटाइज करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या नेतृत्वात राज्य शासनाने दिलेले सर्व नियम व अटी पुढील १० दिवस पाळून हा उत्सव पार पाडायचा संकल्प करण्यात आला, तसेच त्यांस सर्वानी अनुमोदन दिले.

सदर कार्यक्रमास सर्व सदस्यांनी सहभाग दर्शवून बाप्पाची पंरपरा अतुट ठेवली. सर्व सभासदांनी यावेळी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. सर्वजण एकत्र येत मंडळाने आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचे व उपक्रमांचे थोडक्यात चर्चा केली. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सहकार्याच्या उत्कृष्ट नियोजन मुळे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम वेळेत संपन्न झाला. तसेच बाप्पाची आरती ने कार्यक्रमाची सांगता झाली. अशी माहिती श्री. चक्रेश्वर तरूण मंडळाचे अध्यक्ष निलेश देशमुख व उपाध्यक्ष कालिदास सोनवणे यांनी दिली.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

21 hours ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

2 days ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

3 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

9 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

9 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

This website uses cookies.