महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिनिधी : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार आळंदीतील युवा गायक वारकरी कीर्तनातील संगीतरत्न अवधूत गांधी यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.
या पुरस्कारांत शाहिरी फेटा, मोत्याचा शिरपेच, स्मृतीचिन्ह व रुपये अकरा हजार रुपये रोख असे स्वरूप आहे. या पुरस्काराचे हे एकवीसावे वर्ष आहे. एक वर्षी शाहीर व दुसऱ्या वर्षी लोककला या पद्धतीने पुरस्कार वितरण दरवर्षी केले जाते. या वर्षी ‘वारकरी कीर्तनातील संगीत’ या विषयासाठी अवधूत गांधी यांची निवड करण्यात आली.
वारकरी सांप्रदायिक भजनाची गांधी घराण्यात परंपरा असून अवधूत गांधी यांनी वारकरी भजन, पखवाज वादन, लोकसंगीत गायन, पार्श्वगायन अशी चौफेर मुशाफिरी केली आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त सारख्या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले आहे. शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या अध्यक्षते खाली निवड समितीने अवधूत गांधी यांची निवड जाहीर केली. डॉ. मिलींद भोई, शाहीर गणेशदादा टोकेकर, शाहीर चेतन हिंगे निवड समितीवर कार्यरत आहेत. शाहीर हिंगे यांच्या ९१ व्या जयंती दिनी पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
या पुरस्काराच्या घोषणेचे आळंदीत स्वागत करण्यात आले. आळंदीतील नगरसेवक सभापती सागर भोसले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदींनी युवा गायक गांधी यांचे अभिनंदन केले.
——–
बुधवार, ५ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघात…
सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
रविवार, २ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 धरण…
शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…
गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
This website uses cookies.