भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील एकमेव असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिरात पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक विश्वस्त व पुजारी यांच्या हस्ते सोमवारी पहाटे करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.
श्रावणी सोमवार निमित्त देशभरातून लाखों भाविक याठिकाणी येत असतात परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मंदिर परिसरात असलेली हार, फुले, पेढे, प्रसाद व इतर सर्व दुकाने बंद असल्याने परिसरात शुकशुकाट दिसत होता. मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले असल्याने याठिकाणी दर्शनासाठी व पर्यटनासाठी कोणीही येऊ नये यासाठी मंचर – भीमाशंकर रोडवर डिंभे व पालखेवाडी येथे पोलिस चेकपोस्ट उभारलेले होते. तेथून पुढे येणाऱ्या वाहनांवर अटकाव केला जात असल्याची माहिती घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.
सध्या कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे लॉकडाऊन सुरू आहे. मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी मंदिरे बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुणे-नाशिक…
गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमधील…
बुधवार, ५ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघात…
सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
रविवार, २ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 धरण…
शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…
This website uses cookies.