गुन्हेगारी

ओझर विघ्नहर्त्याच्या मंदिरात चोरट्यांचा दानपेटीवर डल्ला

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
ओझर : अष्टविनायक मधील एक प्रसिद्ध तिर्थक्षेत्र ओझर(ozar) ( ता. जुन्नर ) येथील विघ्नहर गणपती मंदिरात आज पहाटे दोनच्या सुमारस दानपेटी सह गाभाऱ्यातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला(crime). चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला असून चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, सीसीटीव्हीत दोन अज्ञात चोरटे असल्याचे दिसून येते आहे.
चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील गणेशमूर्तीच्या वरील अंदाजे दिड किलो वजनाची चांदीची छत्री पळवून नेली. तसेच गाभाऱ्यातील एक तिजोरी पळवून नेऊन ती फोडून त्यातील रक्कम काढून घेऊन ती मंदिराच्या बाहेर फेकून चोरट्यांनी तेथून पोबारा केला.
कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या चार महिन्यांपासून  मंदिर बंद होते. एप्रिल महिन्यात तिजोरीतील रकमेची मोजदात करण्यात आली होती, मंदिर बंद असल्याने तिजोरीत फारशी रक्कम नसावी, अशी माहिती विघ्नहर गणपती देवस्थानचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे यांनी दिली. ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक या घटनेचा अधिक तपास करीत आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

5 hours ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

2 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

1 week ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 weeks ago

This website uses cookies.