निवडणूक

शिरुर लोकसभा मतदारसंघात ग्रामस्थांकडून मतदानाचा संकल्प

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर
पुणे, दि.३१:
लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप पथकामार्फत मतदान जनजागृती करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील ग्रामस्थांनी मतदान करण्याचा संकल्प केला.

आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. निरगुडसर येथे स्वीप पथकाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने ग्रामस्थांकडून मतदान संकल्प पत्र भरुन घेतले.

शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि मतदानाचे महत्व पटवून दिले. तसेच मतदान करण्याविषयी मार्गदर्शन केले आणि मतदान करण्यासाठी आवाहन केल.

पंडित नेहरु विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोहे खुर्द गावात मतदान संकल्प पत्राचे वाटप केले आणि पालकांकडून मतदान करण्याचे संकल्प पत्र भरुन घेतले. निरगुडसर येथील पंडित नेहरु विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही पालकांकडून मतदान करण्याचे संकल्प पत्र भरुन घेतले.

आंबेगाव विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील मंचर येथे महात्मा गांधी विद्यालयाचे सुमारे शंभर विद्यार्थी मतदान जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी पालकांकडून आणि परिसरातील ग्रामस्थांकडून मतदान संकल्प पत्र भरुन घेतले.

मतदान जनजागृती उपक्रमात स्वीप पथकाने विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेतल्याने त्यांनाही लोकशाही प्रक्रियेचे महत्व समजण्यास मदत होत आहे आणि युवा मतदारांनाही प्रोत्साहन मिळत आहे.

MahaBulletinTeam

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

4 weeks ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.