महाबुलेटिन न्यूज / प्रतिनिधी
राजगुरूनगर : शिरोली ( ता.खेड ) येथील खापरदरा डोंगरावरील माळरानावर दोन अज्ञात तरुणांची डोक्यात धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून केला असल्याची घटना आज ( दि. ८ ) सकाळी उघडकीस आली आहे. एका तरुणाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर व दुसऱ्या तरुणाच्या हातावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केल्याचे दिसून आले आहे.
खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांनी राजगुरूनगर पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. खुनामागचे नेमके कारण अद्याप काय आहे याचा पोलीस पथकाकडून शोध चालू असून या मृत तरुणांची अद्याप ओळख पटलेली नाही. आज सकाळी एक गुराखी खापरदरा या डोंगरावर गुरे चारण्यासाठी गेला असता हि घटना उघडकीस आली. दोन तरुणांचा एकाच वेळी खून झाल्याने त्यांच्यासोबत आणखी काही व्यक्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावर धूम्रपान केल्याच्या वस्तू आढळल्या असून या खुनाचे कारण व खून करणाऱ्यापर्यंत पोहचणे हे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांपुढे आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.