गुन्हेगारी

दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीसह एकास अटक

महाबुलेटिन नेटवर्क।प्रतिनिधी
राजगुरूनगर: शिरोली परिसरातील टेकडीवर दोघांचा खून झाल्यानंतर पोलिसांना या खुनाची उकल करण्यात लवकर यश आले आहे. दुहेरी हत्याकांडातील  पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकाला ताब्यात घेतले आहे मुख्य आरोपी सुरज प्रकाश रणदिवे (रा. नंदनवन होसिंग सोसायटी घरकुल, चिखली, पुणे) आणि किरण चंद्रकांत बेळामगी (रा. निलरत्न हौसिंग सोसायटी घरकुल, चिखली, पुणे) असे आरोपींची नावे आहेत.
या घटनेचा द्रुतगती तपास व घटनाक्रम :
—————————————————-
शनिवारी ( दि. ८ ऑगस्ट ) घडलेल्या दोन अज्ञात तरुणांच्या खुनातील आरोपींना राजगुरूनगर पोलिसांनी १२ तासाच्या आत जेरबंद केली होती. पिंपरी-चिंचवड परिसरात एका तरुणाच्या भावाच्या खुनात सहभाग असल्याच्या संशयातून आपल्या मित्रांच्या मदतीने या दोन तरुणांचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
पोलिसांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, बबलू उर्फ अभिषेक उत्तम भालेराव ( वय १९), ऋषिकेश राजेंद्र वाडेकर ( वय २२ ) व निखिल अशोक शिंदे ( वय २०, सर्व रा. वाडेकरवस्ती, शिरोली, ता. खेड, जि.पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर निरंजन अशोक गुरव ( वय २०, रा. पिंपळे गुरव ) व बजरंग दयानंद जाधव ( वय २२, रा. वैदवस्ती, पिंपळे गुरव, मुळगाव गठेरायपाळी, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक ) अशी खून झालेल्या तरुणांची नावे आहेत. शिरोली येथील खापरदरा या डोंगरावर दोन तरुणाचा खून झाल्याचे शनिवारी समोर आले होते.
     खुनाच्या कटात असलेल्या शिरोली येथील एका तरुणाने आपल्या मोबाईलच्या डीपीवर wp हि दोन अक्षरे लिहून ३०२ लिहिले होते. केवळ हाच धागा पकडून खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने या खुनाचे गूढ शोधून काढले. पिंपरी चिंचवड येथे काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून झाला होता. यातील खून झालेल्या दोघांचा या घटनेत सहभाग असल्याच्या संशयातून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता.
     पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहा. निरिक्षक राहुल लाड, निलेश बडाख हे खुनाचा तपास करीत होते.
      या प्रकरणातील मुख्य आरोपीसह एकास अटक करून  चिंचवड पोलिसांनी आरोपींना खेड पोलिसांकडे सोपवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने व त्यांच्या टीमने सापळा रचून चिंचवड येथे आरोपींना अटक केली.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 days ago

MahaBulletin — 06 Oct 2026

सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 05 Oct 2026

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खरपुडी…

6 days ago

MahaBulletin — 04 Oct 2026

शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आळंदी…

1 week ago

MahaBulletin — 02 Oct 2026

गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिव्यागर…

1 week ago

MahaBulletin — 01 Oct 2026

बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

1 week ago

This website uses cookies.