आदिवासी

शिनोली येथील कोविड सेंटरला मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली भेट

शिनोली येथील कोविड सेंटरला मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली भेट
● आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेत रुग्णांना पोटभर जेवण व पाणीविषयक त्रुटींबाबत प्रशासनाला केल्या सूचना

महाबुलेटीन न्यूज
घोडेगाव : शिनोली येथील कोवीड सेंटरला शिवसेना उपनेते, मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच रुग्णांच्या तब्बेतीची चौकशी करून जेवण व पाणी विषयक त्रुटी दूर करण्यासाठी तालुका प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना केल्या. 

गेल्या काही दिवसापूर्वी सुरु करण्यात आलेल्या शिनोली येथील कोविड सेंटरला दि. २९ रोजी शिवसेना उपनेते, मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी आढळराव पाटील यांनी रुग्णांना भेटून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच तुम्ही सर्व लवकर बरे होऊन घरी परताल, असा संदेश देत मानसिक आधार दिला. येथील बरेचसे रुग्ण आदिवासी भागातील व शेतकरी कुटुंबातील असून मर्यादित जेवण पुरत नसल्याने पोटभर जेवण तसेच नाश्त्याला दररोज मिळणाऱ्या पोह्या ऐवजी अन्य स्वरूपाचा नाश्ता मिळावा, अंघोळीला पुरेसे पाणी मिळावे, अशी मागणी अनेक रुग्णांनी यावेळी मा. खासदार आढळराव पाटील यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर आढळराव पाटील यांनी तात्काळ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीहून संपर्क साधून याठिकाणी येथील एकही रुग्ण अर्धपोटी राहू नये यासाठी रुग्णांना दररोज दोन वेळेस पोटभर जेवण उपलब्ध करून सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, इडली आदी रोटेशन पद्धतीने सकस आकाराचा समावेश करावा, अशा स्वरूपाच्या सूचना केल्या. तसेच रुग्णांना गरम व गरजेइतके पाणी मिळावे यासाठीही अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही निर्णयाबाबत प्रशासनाला सूचना केल्या.

या भेटीदरम्यान उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा करून आरोग्य व्यवस्थेची व रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधांची चौकशी केली. सध्या याठिकाणी ८० रुग्ण असून आत्तापर्यंत २-३ रुग्णांना जास्त त्रास जाणवू लागल्याने पुढील उपचारांसाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली. तसेच रुग्णाना दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा, पिण्याचे पाणी आदी देण्यात येत असल्याचे सांगितले. 

यावेळी मा. खासदार आढळराव पाटील यांच्या समवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, उपतालुकाप्रमुख विश्वास लोहोट, महिला आघाडीच्या कलावती पोटकुले आदी उपस्थित होते. या ठिकाणी आढळराव पाटील कोविड सेंटरला भेट द्यायला आल्याचे समजल्यावर अनेक रुग्ण आनंदित होऊन त्याना पाहण्यासाठी आपल्या खोलीबाहेर उभे राहिले होते.
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.