महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : कोविड 19 तथा कोरोना विषाणु या संसर्गजन्य महामारीने सर्वत्र थैमान घातले असल्याने महाराष्ट्र राज्याचा ६१ वा वर्धापन दिन गतवर्षी प्रमाणे अत्यंत साधेपणाने फक्त जिल्हा मुख्यालय या ठिकाणी प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात येणार आहे, महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल महोदय यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन परीपत्रक क्रमांक,सोई आर २०२१ / प्र. क. ३४ /३० मंत्रालय ३२ तारीख २८ एप्रिल २०२१ आदेशा प्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अवर सचिव राजेंद्र गायकवाड यांच्या सहीने सदर पत्रक काढले असुन ,त्यांच्या प्रती सर्व संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.
सदर परीपत्रकात कोरोना विषाणु ची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन, ६१ वा महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन, गतवर्षी प्रमाणे अत्यंत साधेपणाने, फक्त जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करुन साजरा करण्यात यावा ,अशा मार्गदर्शक सुचेना केल्या असुन, पुणे नागपूर औरंगाबाद नाशिक व अमरावती या ठिकाणी मा. विभागीय आयुक्त यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करावे, या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी वेगळे आयोजन करुन नये, असे सदर परीपत्रकात म्हटले आहे, इतर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे म्हटले आहे,
सदर कार्यक्रमास मा. पालकमंत्री, विभागीय आयुक्त, महापौर जिल्हाधिकारी , महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त , जिल्हा पोलिस अधीक्षक , मुख्यकार्यकारी अधिकारी, यांनीच उपस्थित राहावे, व पालकमंत्री ध्वजारोहण करतील ,काही अन्य कारणांनी पालकमंत्री उपस्थित नसल्यास विभागीय आयुक्त यांनी ध्वजारोहण करावे अशा मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे, तसेच विधीमंडळ व मा. उच्च न्यायालयात कमीतकमी उपस्थित ध्वजारोहण करण्यात यावे, असे म्हटले आहे.
इतर कवायती व सांस्कृतिक कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत, असा स्पष्ट उल्लेख सदर परीपत्रकात केला आहे, त्यामुळे, यावेळी ६१ महाराष्ट्र दिन वर्धापन सोहळ्या निमित्त फक्त जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे, असे शासनाचे आदेश आहेत.
०००००
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.