महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : गावातील शासकीय जमिन, गायरान जमिनीवर राजकीय पुढारी, कर्मचारी, लहान– मोठे व्यावसायिक, ग्रामस्थ अथवाअन्य कोणीही अतिक्रमण केले असेल तर तर त्यांना महागात पडणार आहे. खेड तालुक्यातील सर्व महसूली गावांमध्ये अशा प्रकारेअतिक्रमण झाले आहे का, अतिक्रमण कोणी केले, किती जागेवर अतिक्रमण केले, कधी पासून अतिक्रमण केले अदी सर्व माहितीप्रत्यक्ष स्थळपाहणी करुन पंचनाम्यासह हितसंबंधितांचे जाब जबाब घेऊन त्वरीत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी अधिकारी, कर्मचारी यांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यात शासकीय व गायरान जमिनीवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यामुळेच सध्याग्रामपंचायतींना सार्वजनिक वापरासाठी एखादा प्रकल्प उभारताना जागा उपलब्ध नसल्याने निधी उपलब्ध होऊनही विकास कामे करतायेत नाही. ब्रिटिश कालापासून गावातील सार्वजनिक वापरासाठी असलेल्या शासकीय जमिनी गुरचरण, गायरान जमिनी, स्मशानभूमी, उत्सव साजरे करण्यासाठी इत्यादी जमिनीवर संबंधित गावाच्या वाहिवाटेचे हक्क व अधिकार असतात. अशा शासकीय जमिनीग्रामपंचायतीकडे गटनिहाय नोंद देखील असते.
परंतु गेले काही वर्षात पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने खेड तालुक्यात जमिनीला प्रचंड भाव आल्याने सर्रास शासकीय, गायरान जमिनीवरअतिक्रमण केले जाते. यामध्ये अनेक वेळा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्याकडून ही अतिक्रमण केली जातात. परंतु अशा शासकीयजमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिध्द झाल्यास संबंधित व्यक्तीला तातडीन पदावरू निलंबित केले जात असल्याने काही प्रमाणात आळाबसला आहे. मात्र याच राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून अन्य पध्दतीने अतिक्रमण केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर खेड प्रांतअधिकारी विक्रांत चव्हाण यांनी तालुक्यातील सर् महसूली गावांमध्ये शासकीय, गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याची माहितीसंकलित करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी संबंधित अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, क्लार्क, सर्कल तलाठी आदी कर्मचारी यांची टीम तयार करण्यात आली आहे.
यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी गावात जाऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन पंचनाम्यासह हितसंबंधितांचे जाब जबाबघेऊन त्वरीत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
———
# प्रत्यक्ष जाऊन अतिक्रमणांची माहिती घेण्याचे काम सुरू :-
खेड तालुक्यातील महसूली गावांमध्ये शासकीय, गायरान जमिनीवर झालेली अतिक्रमण शोध मोहीम सुरू आहे. वरीष्ठ कार्यालयाकडून या संदर्भातील आदेश देण्यात आले असून, यासाठी अधिकारी, कर्मचारी याची टीम तयार करण्यात आली आहे. काही गावांची माहिती गोळा झाली असून, काही शिल्लक आहेत. सर्व गावांचा सर्व्हे पूर्ण करून लवकरच वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर करू – संजय शिंदे, नायब तहसिलदार, खेड
———-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.