गुन्हेगारी

चाकण एमआयडीसीतील दुहेरी खुनातील आरोपीला महाळुंगे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चाकण एमआयडीसीतील दुहेरी खुनातील आरोपीला महाळुंगे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महाबुलेटीन न्यूज

महाळुंगे इंगळे : चाकण औद्योगिक परिसरातील सावरदरी ( ता. खेड ) येथे दोन तरुणांचा खून करून फरारी झालेल्या आरोपीलामहाळुंगे पोलिसांनी वाशीम जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. खून करून दुचाकीवरून वाशिमला पलायन केल्यानंतर आरोपीगेल्या दोन दिवसांपासून एका शेतात लपला असता पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदिप दिलीप भगत ( रा. सावरदरी, ता. खेड, जि. पुणे, मूळगाव वाशीम ) असे अटक केलेल्याआरोपीचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी कि, आरोपी प्रदिप हा फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेची छेड काढून तिला वारंवार त्रास देतहोता. तसेच महिला राहत असलेल्या घराच्या बाथरूमची खिडकीची काच फोडल्याच्या कारणाने फिर्यादीचे पती मयत सुरज नंदकुमारचव्हाण (वय २७) त्याचा मित्र मयत अनिकेत किसन पवार (वय २४) हे दोघे आरोपीस जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीप्रदिप भगत याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर उपचार करण्यापूर्वीच ते मयत झाले होते.

शनिवार, दि. ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास सावरदरी गावच्या हद्दीत भक्ती अपार्टमेंट, मंगल शेटे यांच्याइमारती समोर ही घटना घडली.

स्वप्नाली सूरज चव्हाण (वय २९, रा. सावरदरी, ता. खेड, जि. पुणे, मूळगाव किरोली पठार, ता. कोरेगाव, जि. सातारा ) यांनी याबाबतफिर्याद दिली आहे.

पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त परी मंडळ मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, गुन्हेशाखा तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश आढारी, ऋषिकेश भोसुरे, राहुलसूर्यवंशी महेश भालचिम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

# भाडेकरूंची माहिती द्या : वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे.                                            


चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्हा राज्याबाहेरील कामगार कामासाठी आल्याने अशा गंभीर घटना समोर येतआहेत. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी त्यांना भाड्याने खोली, फ्लॅट देताना त्यांची कागदपत्रे पोलीस ठाण्यातून चारित्र पडताळणीकरून घ्यावी. ज्यामुळे अशा घटनांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर पोलिसांना चाप बसविण्यास मदत होईल. यापुढे आपापल्याखोल्यांमधील भाडेकरूंची माहिती घर मालकांनी विहित नमुन्यात पोलीस ठाण्यात द्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे किशोर पाटील यांनी दिला आहे.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

1 hour ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

1 week ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

This website uses cookies.