महाबुलेटीन न्यूज
चाकण : रोहकल रस्त्यावर कोयत्याने वार करून एकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परवा सावरदरी येथेदोन जणांचा खून झाला होता. त्यांनतर आज पुन्हा खून झाला. मागील दोन दिवसात हा तिसरा खून झाल्याने चाकण उद्योगनगरीहादरली आहे. युसूफ काकर ( वय 18, रा. काकर गल्ली, खंडोबा माळ, चाकण ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना आज ( दि. 10 ) दुपारी साडेबाराच्या सुमारास रोहकल रस्त्यावर घडली. मागील वर्षीझालेल्या एका खून खटल्यात काकर हा विधिसंघर्षित आरोपी होता, पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविलाआहे. काकर हा रिक्षाचालक असून त्याला रिक्षा घेऊन बोलावून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी कोयत्याने वार केल्याने तो गंभीरजखमी होऊन मयत झाला. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
0000
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
This website uses cookies.