गुन्हेगारी

चाकण एमआयडीसीत दोन युवकांचा धारदार शस्त्राने खून, दुहेरी खुनाने उद्योगनगरी हादरली

चाकण एमआयडीसीत दोन युवकांचा धारदार शस्त्राने खून, दुहेरी खुनाने उद्योगनगरी हादरली

महाबुलेटीन न्यूज

चाकण : औद्योगिक परिसरातील सावरदरी ( ता. खेड ) येथे दोन तरुणांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून दुहेरी खुनामुळे अवघी उद्योगनगरी हादरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली सूरज चव्हाण (वय २९, रा. सावरदरी, ता. खेड, जि. पुणे, मूळगाव किरोली पठार, ता. कोरेगाव, जि. सातारा ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दि. ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास सावरदरीगावच्या हद्दीत भक्ती अपार्टमेंट, मंगल शेटे यांच्या इमारती समोर ही घटना घडली.

आरोपी प्रदिप दिलीप भगत ( रा. सावरदरी, ता. खेड, जि. पुणे, मूळगाव वाशीम ) हा फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेची छेडकाढून तिला वारंवार त्रास देत होता. तसेच महिला राहत असलेल्या घराच्या बाथरूमची खिडकीची काच फोडल्याच्या कारणानेफिर्यादीचे पती मयत सुरज नंदकुमार चव्हाण (वय २७) त्याचा मित्र मयत अनिकेत किसन पवार (वय २४) हे दोघे आरोपीस जाबविचारण्यासाठी गेले असता आरोपी प्रदिप भगत याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.

स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी तळेगाव येथील पवना हॉस्पिटल येथे, तर एकाला चाकण येथील ग्रामीणरुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. फरार आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३०२ नुसार गुन्हादाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त परी मंडळ मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्तप्रेरणा कट्टे यांनी भेट देऊन पाहणी केली.

महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील पोलीसपथक पुढील तपास करीत आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्हा राज्याबाहेरील कामगार कामासाठी आल्याने अशा गंभीर घटनासमोर येत आहेत. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी त्यांना भाड्याने खोली, फ्लॅट देताना त्यांची कागदपत्रे पोलीस ठाण्यातूनचारित्र पडताळणी करून घ्यावी. ज्यामुळे अशा घटनांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर पोलिसांना चाप बसविण्यास मदतहोईल. यापुढे आपापल्या खोल्यांमधील भाडेकरूंची माहिती घर मालकांनी विहित नमुन्यात पोलीस ठाण्यात द्यावी, अन्यथाकायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे किशोर पाटील यांनी दिला आहे.
0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.