महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : “मी सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील लस घेतली, ते खरं नाही. त्यांच्याकडे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस आहे, ती लस आज मी घेतली आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील ही लस घेतली आहे”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
ऑक्सफोर्डच्या कोरोना व्हॅक्सीनचे भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादन होणार आहे. याच सीरम इन्स्टिट्यूटला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज भेट दिली. यावेळी शरद पवार यांनी तिथे तयार करण्यात आलेली कोरोनावरील लस घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतू, पत्रकार परिषदेत पवारांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘मी सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील लस घेतल्याचे काही लोक म्हणत आहेत. पण, ते खरं नाही. त्यांच्याकडे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस आहे, ती लस आज मी घेतली आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफने देखील ही लस घेतली आहे. कोरोनावरील लस यायला जानेवारी उजाडेल, अशी माहिती पवारांनी यावेळी दिली.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.