महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले आहे. परवा बुधवारी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे सांगितले आहे. परवा बुधवारी ३१ मार्च रोजी शरद पवार यांच्यावर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, सध्या सुरू असणारी औषधे बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती मलिक यांनी दिली. शरद पवार यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.