महाराष्ट्र

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली : एस. एम. देशमुख

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली : एस. एम. देशमुख

महाबुलेटीन न्यूज 
मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होईल, अशी जोरदार चर्चा मुंबईत होती. पण तसे काहीच झाले नाही. राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्यातील पत्रकारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारच्या पत्रकारांप्रती असलेल्या उदासिन भूमिकेबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी तीव्र नापसंती आणि चिंता व्यक्त केली आहे. देशातील आठ राज्यांनी पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून जाहीर केले असले तरी महाराष्ट्र सरकारला पत्रकारांचे एवढे वावडे का? असा सवाल देशमुख यांनी केला आहे. 

याबाबत माहिती अशी आहे की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी हा मुद्दा बैठकीत उपस्थित केला असला तरी त्यावर काहीच निर्णय झाला नाही. काही मंत्री, खासदार, आमदारांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र पाठवून देखील काही उपयोग झाला नाही. मराठी पत्रकार परिषदेने राज्यभर ई मेल पाठवा आंदोलन केले होते. एक हजार मेल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. उपयोग होत नाही म्हटल्यावर परिषदेने आत्मक्लेष आंदोलन करून घरी बसून 2000 पत्रकारांनी उपवास केला. तरीही सरकार ढिम्म आहे. सरकारच्या मनात पत्रकारां बद्दल एवढी अढी का? असा सवाल एस. एम. देशमुख यांनी उपस्थित केला आहे. 

सरकारने पत्रकारांना वाऱ्यावर सोडले असले तरी कोरोना पत्रकारांचा पिच्छा सोडायला तयार नाही. आज अक्कलकोट येथील पत्रकार शंकर हिरतोट यांचं कोरोनानं निधन झालं. त्यामुळे कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांची संख्या आता 124 झाली आहे. जवळपास 300 पत्रकार राज्यातील विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना कोणत्याच चांगल्या सुविधा मिळताना दिसत नाहीत.

सरकार जाणीवपूर्वक पत्रकारांबद्दल सकारात्मक निर्णय घेत नसेल, तर पत्रकारांना ठोस भूमिका घ्यावी लागेल. यापुढे काय करायचे याचा निर्णय घेण्यासाठी शनिवारी सकाळी 10 वाजता ऑनलाईन बैठक होत आहे. त्यात पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी दिली.
——

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.