महाबुलेटीन न्यूज । अर्जुन मेदनकर
आळंदी, ३ जुलै : येथील आळंदी-पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत दही, दूधाचा व मधाचा अभिषेक घालून माऊलींचे पादुकांची प्रतिकात्मक महापुजा श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माऊलीसह भगवान पांडुरंगाची आरती झाली.
मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही पालखी सोहळ्यावर कोरोना महामारीचे सावट असल्याने माऊलींच्या पादुका पालखी वारी निमित्त पंढरपूरला बसने नेण्यात येणार आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात विसावा घेऊन संत श्रीच्या वैभवी पादुकांची महापूजा हरिनाम गजरात परंपरेनुसार केली जाते. मात्र या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या चल पादुका एस. टी. बसने पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. त्यामुळे गेली २५० वर्षांची परंपरा खंडित होऊ नये. यासाठी थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे श्रींची प्रतिकात्मक पूजा संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. माऊलींच्या चल पादुकांना सकाळी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती व महाप्रसादाचा महानेवेद्य दाखविण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर, ह.भ.प. रमेश घोंगडे, ह.भ.प. पप्पू ब्रम्हे काका, ह.भ.प. बाबूलाल तापकीर, सखाराम तापकीर, सुशीला तापकिर, संगीता काळजे आदी भाविक उपस्थित होते.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.