महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : रोटरी क्लब चाकणचे वतीने चाकण शहरातील डॉक्टर्स, प्राथमिक आरोग्य केंद्र, चाकणच्या वैद्यकीय अधीक्षक श्रीमती ढवळे, प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगावच्या वैद्यकीय अधीक्षक श्रीमती डॉ. इंदिरा पारखे आदी 15 डॉक्टर्स यांना “नॅशनल डॉक्टर्स डे ” निमित्त चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अशोक राजपूत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब चाकणचे 2021-22 वर्षातील नवनिर्वाचित अध्यक्ष रो. सुभाष वाडेकर, सचिव विनय भुजबळ व संचालक मंडळ यांचा अधिकार स्वीकार समारंभ, रोटरी प्रथेनुसार संपन्न झाला. ह्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे चाकण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. ढवळे व चाकण शहरातील डॉक्टर्स व रोटरी सदस्य उपस्थित होते.
2020-21 चे अध्यक्ष दीपक करपे व सचिव सुभाष शिंदे यांनी नवीन अध्यक्ष व सचिव यांना रोटरीची सर्व सूत्रे प्रदान केली.
वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान घोडेकर यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव, यांच्या सूचनेला अनुसरून 150 मास्क केंद्राच्या डॉक्टर श्रीमती इंदिरा पारखे यांना प्रदान करण्यात आले.
श्रीमती इंदिरा पारखे व त्यांचे दोन सहकारी डॉक्टर्स यांना नॅशनल डॉक्टर्स डे निमित्त सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब चाकणचे अध्यक्ष सुभाष वाडेकर, सचिव विनय भुजबळ, माजी अध्यक्ष दीपक करपे व रोटरी सदस्य मोहन परदेशी हे उपस्थित होते.
००००
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.