महाबुलेटीन न्यूज : यंदाच्या संसदरत्न पुरस्कार 2023 ची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राच्या चार खासदारांचा समावेश आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार टी. के. रंगराजन यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, महाराष्ट्रातील लोकसभा खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे, भाजपचे गोपाळ शेट्टी, भाजपच्या हिना गावित, राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
लोकसभेतील खासदारांना नामांकन मिळालेल्या नेत्यांमध्ये भाजपचे बिद्युत बरन महतो, डॉ सुकांत मुजुमदार, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, कुलदीपराय शर्मा, विजयकुमार गावित, गोपाळ शेट्टी, सुधीर गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तर राज्यसभेत नामांकन मिळालेल्या नेत्यांमध्ये सीपीएमचे जॉन ब्रिट्स, राजदचे मनोज झा, राष्ट्रवादीचे फौजिया खान, सपाचे विश्वंभर निषाद, काँग्रेसच्या छाया वर्मा त्याचबरोबर लोकसभेच्या वित्त समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा आणि परिवहन पर्यटन आणि सांस्कृतीक समितीचे अध्यक्ष विजयसाई रेड्डी यांच्या नावाचाही यात समावेश आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी संसदरत्न पुरस्कार सुरू करण्याची सूचना केली होती. लोकसभेचे ५४४ आणि राज्यसभेच्या २५४ खासदारांपैकी एका संसदरत्नाची निवड केली जाते. त्यासाठी काही निवडक नावे जाहीर केली जातात. यासाठी संसदेतील खासदारांची उपस्थिती, त्यांनी मांडलेली विधेयके, चर्चेतील सहभाग आदी विविध मुद्यांचा विचार करून खासदारांना नामांकनदिले जातात. निवड झालेल्यांना २५ मार्चला हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 0000
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.