महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : सांगुर्डी-कान्हेवाडी वि. वि. का. सोसायटीच्या संचालक पदी राष्ट्रवादीचे युवा नेते वसंतराव भसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रघुनाथ बबन भसे यांनी सोसायटीचे सेक्रेटरी संतोष डांगले यांच्याकडे आपला राजीनामा दिला होता. नुकत्याच झालेल्या मिटिंगला तो मंजूर करण्यात आला. रिक्त झालेल्या पदासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत इच्छुक उमदवारांना अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ठरलेल्या प्रोग्रॅम प्रमाणे ३१ ऑगस्ट पर्यंत वसंत भसे पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे दि. १० सप्टेंबर रोजी झालेल्या मिटिंग मध्ये वसंत भसे हे बिनविरोध निवडून आल्याचे सेक्रेटरी संतोष डांगले यांनी घोषीत केले.
सोसायटीचे मा. चेअरमन कृष्णाजी भसे यांच्या हस्ते मावळते संचालक रघुनाथ भसे यांचा सत्कार करण्यात आला. नायब तहसीलदार महादेव भसे यांनी वसंत भसे यांना शुभेच्छा दिल्या. विजय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. नवनिर्वाचित संचालक वसंतराव भसे यांनी सांगुर्डी व कान्हेवाडी मधील सर्व ग्रामस्थ व सोसायटील सर्व संचालक मंडळाचे निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. मा. सरपंच अंकुश भसे, निवृत्ती भोसले, गणेश भसे, दिनकर भसे, कडजादेवी दिंडीचे अध्यक्ष हभप. बाळासाहेब भसे, नंदू भसे, चंद्रकांत भसे, संतोष भसे, अर्जुन भसे, तानाजीराव काळे, मा. तंटामुक्ती अध्यक्ष संतोष भसे, सोसायटी संचालक व ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.