महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : जेष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्यासोबत महाकला मंडलच्या शिष्टमंडळाची नुकतीच पुणे येथे मिटिंग झाली. या भेटीमध्ये प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कला प्रकारातील एकत्रित झालेल्या १२० संघटनांची माहिती पवार साहेबांनी घेतली.
कायमस्वरूपी सर्व कलावंताची अडचण सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर कलाकार कल्याण मंडळ शासनाने स्थापन करून कलावंतांची अडचणी दूर करण्याचे काम या मंडळामार्फत व्हावे, सर्व कलावंतांचा आरोग्य विमा शासनाने या मंडळ मार्फत काढावा, कलावंतांसाठी घरकुल योजना, आपत्कालीन तातडीची मदत, विविध कला प्रकारात काम करणाऱ्या कलावंतांची नोंद शासनाकडे व्हावी, अशा विविध गोष्टींचा निर्णय शासनाने ताबडतोब घेण्यासाठी मा. पवार साहेबांनी या आठवड्यात मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. सांस्कृतिक मंत्री आणि महाकला मंडलचे प्रतिनिधी यांची संयुक्त मिटिंग लावण्याची सूचना सी. एम. ऑफिसला दिल्या.
पवार साहेबांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे, महाकला मंडलच्या शिष्ट मंडळला अतिशय आनंद झाला. लवकरच ही मीटिंग होईल अशी आशा आहे.
या शिष्टमंडळात महा कला मंडलचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, जयमाला काळे इनामदार, पूजा पवार साळुंखे हे उपस्थित होते.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.