निधन वार्ता

सच्चा मित्र, मार्गदर्शक हरपला : माजी आमदार विलास लांडे

माजी नगरसेवक साहेबराव खरात यांचे निधन
विलास लांडे यांनी वाहिली श्रद्धांजली …

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
आमचे सहकारी मित्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मा. साहेबराव खरात अनपेक्षितपणे आपल्या सर्वांना कायमचे सोडून गेले. कुटुंबाला, सर्व मित्र परिवाराला, नातेवाईकांना आणि समस्त भोसरी गव्हाणेवस्ती वासीयांना दुःखाच्या गर्तेत सोडून साहेबराव गेले. जनसामान्यांसाठी अहोरात्र लढणारा एक सरळमार्गी पण तितकाच परखड असा जनसेवक म्हणून त्यांची शहरभर ख्याती होती.

बहुजनांचा आवाज सभागृहात बुलंद करणारा एक लढवैय्या नगरसेवक, प्रत्येकाला माफ करणारा हळव्या मनाचा दिलदार मित्र, आदरणीय शरद पवार साहेब आणि नामदार अजितदादा पवार साहेब यांच्यावर नितांत प्रेम करणारा राष्ट्रवादीचा एक सच्चा कार्यकर्ता आपल्यातून गेल्याचं आभाळाएवढं दुःख सहन होण्यापालिकडचे आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. कालकथीत साहेबरावजी खरात यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

साहेबरावांच्या अचानक जाण्याने त्यांच्या अनेक आठवणी मनात ताज्या झाल्या आहेत. साहेबराव खरात व कुटुंबीय मूळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी पण कामानिमित्त पुण्यात आले व गरवारे कंपनीत कामाला लागले. पुढे कंपनीचा राजीनामा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्याने आपल्या परीने जमेल तशी जनसेवेची कामेही ते त्यावेळी मार्गी लावत होते.

2002 साली लातूरचे देवीदासजी माने यांना घेऊन माझ्याकडे आले व म्हणाले “महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून यांना संधी द्या.” मी साहेबरावांना स्वतः निवडणुकीत उभे राहण्याचा सल्ला दिला, कारण मला त्यांच्या कामाची माहिती होतीच, नाही हो करत शेवटी घरच्यांच्या संमतीने त्यांनी होकार दिला, पक्षाचे तिकीट मिळू शकले नाही पण आमच्या मार्गदर्शनामुळे नगरसेवक पदासाठी आमच्या अपक्ष पॅनलमधून ते लढले व विजयी झाले. पुढे अजितदादांना भेटल्यावर त्यांनी “विलास लांडे हे तुमच्यावर नितांत प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, तुम्ही आम्हाला ओळखायला विसरलात दादा” अशी प्रेमळ तक्रारही त्यांनी थेट अजितदादांकडेच केली.

साहेबरावांच्या कामाची विशिष्ट पद्धत, नेहमी सत्याची कास धरून असत्य व अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची त्यांची दमदार शैली सर्वसामान्यांच्या मनात घर करणारी ठरली. आणि त्यापुढची पाचही वर्षे भोसरी गव्हाणेवस्ती परिसरात “घराघरात खरात” ही उक्ती प्रचलित झाली. 2002 ते 2007 या त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रभागातील कुणा नागरिकाचे काम झाले नाही असा एकही नागरिक सापडणार नाही. टाइम्स ऑफ इंडिया सारख्या अग्रगण्य दैनिकाने साहेबरावांची मुलाखत आपल्या दैनिकात छापत “सर्वोत्तम नगरसेवक” म्हणून त्यांच्या कामाचा गौरव केला. पुढे अजितदादांनी साहेबरावांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या, अजितदादांचा पिंपरी चिंचवडमधील सर्वात लाडका कार्यकर्ता, नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. कधीही दादा भेटले की साहेबरावांची प्रेमाने विचारपूस करायचे.

कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर चालणारा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व नामदार अजितदादा पवार साहेब यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून लोकांसाठी झटणारा राष्ट्रवादीचा एक निस्सीम कार्यकर्ता गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
— विलास विठोबा लांडे ( प्रथम आमदार, भोसरी विधानसभा ) आणि मित्र परिवार

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.